ग्रामपंचायत भावसे बद्दल

ग्रामपंचायत भावसे (आ. भावसे, पोस्ट तानसा, ता. शहापूर, जि. ठाणे) ही ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गसंपन्न परिसरात वसलेली ग्रामपंचायत आहे. भावसे गाव मावळी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले असून गावाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच हे गाव तानसा अभयारण्याने वेढलेले असून या परिसरात विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात. गावावर वारकरी संप्रदायाचा खोल प्रभाव असून श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या कृपेने गाव धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे.

ग्रामपंचायत भावसेची एकूण लोकसंख्या सुमारे १९८२ असून सुमारे ४३० कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावातील साक्षरतेचे प्रमाण अंदाजे ९०% आहे. ग्रामपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ११६५.०७ हेक्टर असून येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून शेतीमजुरी व मासेमारी व्यवसायही केला जातो. गावाच्या पूर्वेस तानसा नदी असून तानसा–मोडकसागर धरण मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे जलस्रोत आहेत. गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेतात.

🏛️ प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत भावसे ही शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७ सदस्य कार्यरत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित सभा व ग्रामसभांचे आयोजन केले जाते.

सध्या ग्रामपंचायत भावसेच्या सरपंचपदावर सौ. नयना अशोक भुसारे (मो. ८००७७९७५१८) कार्यरत असून उपसरपंचपदावर सौ. रोशनी रमेश वार्ता (मो. ८२६३८४२१३४) आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सौ. सीमा सद्गीर (मो. ८३६९००४८७१) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जाते.

ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती

ग्रामपंचायत भावसे
At – भावसे, Post – तानसा,
Tal – शहापूर, Dist – ठाणे

📧 ई-मेल: bhavsegrampanchayat@gmail.com

📞 सरपंच: सौ. नयना अशोक भुसारे – ८००७७९७५१८
📞 उपसरपंच: सौ. रोशनी रमेश वार्ता – ८२६३८४२१३४
📞 ग्रामपंचायत अधिकारी: सौ. सीमा सद्गीर – ८३६९००४८७१

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत भावसेमध्ये एकूण ७ सदस्य कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत सदस्य:
सयली पाटील, आराध्या महाले, छाया ढपाटे, प्रज्ञा वेखंडे, जनार्दन महाले, अभिमन्यू ठाकरे, राजेश आमले.

ही सर्व सदस्य मंडळी ग्रामपंचायतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असून पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत आढावा

ग्रामपंचायत भावसे अंतर्गत भावसे, खोस्ते, बिबिचा पाडा, तानसा व अकराचा पाडा ही गावे/वस्त्या येतात.
ग्रामपंचायत हद्दीत एकूण ४ शाळा कार्यरत असून प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. तसेच ५ अंगणवाडी केंद्रे असून लहान मुलांचे पोषण, आरोग्य तपासणी व महिलांसाठी आहारविषयक मार्गदर्शन केले जाते.

गावात ग्रामपंचायत भवन, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, इंटरनेट सुविधा, डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र), व्यायामशाळा व तलाव / गाव तलाव अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत भवनात सर्व शासकीय सेवा सुरळीतपणे पुरविल्या जातात.

योजना व विकास उपक्रम

ग्रामपंचायत भावसे अंतर्गत खालील प्रमुख योजना राबविण्यात येत आहेत:

  • प्रधानमंत्री आवास योजना – २७ घरकुले

  • शबरी आवास योजना – २० घरकुले

  • मोदी आवास योजना – २ घरकुले

  • जनमन योजना – २३ घरकुले

  • महिला बचत गट – २६ गट

  • जलजीवन मिशन – तानसा व अकराचा पाडा नळ पाणीपुरवठा योजना

याशिवाय जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, महिला बचतगट व उद्योजकता योजना, आदिम घरकुल योजना आदी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹२,८१,८९७/- असून तो प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, दिव्यांग, महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याण, रस्ते, कृषी, पशुसंवर्धन व सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरला जातो.

धार्मिक व सांस्कृतिक जीवन

ग्रामपंचायत भावसेमध्ये श्री चैतन्य कानिफनाथ महाराज समाधी, गावदेवी मंदिर, प. पु. रमन्नाथ महाराज समाधी ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. गावात रंगपंचमी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्त जयंती हे सण श्रद्धा व उत्साहाने साजरे केले जातात. तसेच तारपा, नृत्य व ढोल पथक या पारंपरिक कला जोपासल्या जातात.

महिला सक्षमीकरण व पर्यावरण उपक्रम

महिला सक्षमीकरणासाठी गावदेवी ग्रामसंघ कार्यरत असून अगरबत्ती मशीन, पत्रावली मशीन यांसारखे उद्योग चालविले जातात.
पर्यावरण संवर्धनासाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण, तसेच सौर ऊर्जा उपक्रम राबविण्यात आले आहेत.

पुरस्कार व सन्मान

  • आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार

  • संत गाडगेबाबा तंटामुक्त ग्राम पुरस्कार

  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

सशक्त व्यवस्थापन

सर्व ग्रामपंचायतींचे संपूर्ण डिजिटायझेशन

आरोग्य व शिक्षण

ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणा

रोजगार

महिला उद्योजकता व युवक कौशल्य विकास

प्रत्येक गाव स्वच्छ, डिजिटल आणि शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण बनविण्याचा आपला संकल्प आहे.

शहापूर पंचायत समिती